Home Accident News प्रवासी साखरझोपेत, भरधाव ट्रॅव्हल्स पलटली, भीषण अपघात, एकाचा मृ्त्यू, १५ ते २०...

प्रवासी साखरझोपेत, भरधाव ट्रॅव्हल्स पलटली, भीषण अपघात, एकाचा मृ्त्यू, १५ ते २० जण जखमी

Breaking News | Nashik Accident: चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बस पलटी होत भीषण अपघात.

Travels overturned, terrible accident, one dead, 15 to 20 injured

नाशिक: सिन्नर-पुणे महामार्गावरील गोंदे फाटा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बस पलटी होत भीषण अपघात झाला. महाकाली ट्रॅव्हलची ही बस पुण्याकडून नाशिकच्या दिशेने येत होती. समृद्धी महामार्गावरील ‘इंटरचेंज’ पॉइंटजवळ हा अपघात झाला. अपघातात १५ ते २० जण जखमी झाल्याचे वावी पोलिसांनी सांगितले. त्यापैकी चार-पाच प्रवाशी गंभीर जखमी आहेत. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. वावी पोलिस व महामार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, पंचनामा सुरू आहे. तर जखमींना सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान अपघातात मृत झालेल्या प्रवाशाचे नाव कश्यप मुकेशभाई पाठक (३५) रा. अहमदाबाद, गुजरात येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जखमींमध्ये अब्दुल रज्जाक, सोनाली शेजवळ, मालता शेजवळ, सुंधी सोनी, अशरीध रेड्डी, प्रकाश कौटि, प्रियंका आलेवर, पवन पांचाळ, शुभम जाधव, भगवान इंगळे, अनिल निकमले, मुकेश सोळंकी, शिवाजी नालेकर, राणी कांची, अमित पांचाळ, निखिल कांडेकोरी, प्रियांशु अलवार, महेश बिडवे, तुषार मिस्त्री, पवन पावरा, राधेश्याम पावरा, रितेश भिल, बशीर चेतन सूर्यवंशी, सुरेश वाघेला मोहम्मद अली, मेहुल प्रजापती, सोनम पवार, विवेक मिस्त्री यांचा समावेश आहे.

जखमी रुग्णांना त्वरीत सिन्नर येथील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, पोलीस उपनिरीक्षक देविदास लाड, नितीन कदम तसेच अन्य सहकारी आणि महामार्ग पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच अपघात झाल्यानंतर दहा मिनिटातच नांदूरशिंगोटे व सिन्नर येथील रुग्णवाहिका तातडीने दाखल होत स्थानिक ग्रामस्थ व पोलीस यांच्या मदतीने जखमींना बाहेर काढत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Web Title: Travels overturned, terrible accident, one dead, 15 to 20 injured

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here