Home बीड टवाळखोरांना कंटाळून तिने संपविले जीवन

टवाळखोरांना कंटाळून तिने संपविले जीवन

Breaking News | Beed: आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलीला शाळेत जाताना टवाळखोर तिला दगड मारायचे, अश्लील भाषेत संवाद साधायचे, विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या.

She ended her life by getting tired of the vagrants

केज | बीड: आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलीला शाळेत जाताना टवाळखोर तिला दगड मारायचे, अश्लील भाषेत संवाद साधायचे. मुलीने ही बाब घरी सांगितल्यानंतरही काही फरक पडला नाही. त्यामुळे कंटाळलेल्या मुलीने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. घरच्यांनी वेळीच रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्यावर आठ दिवस उपचार सुरू होते. अखेर तिची झुंज अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी दोन तरुणांवर शुक्रवारी युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील औरंगपूर येथील हर्षदा दत्तात्रय फस्के (वय १४) ही बनसारोळा येथील आदर्श कन्या विद्यालयात आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. शाळेत जाताना कुंबेफळ येथील संकेत राहुल शिंदे व सोमनाथ रघुनाथ डिवरे तिची छेडछाड करायचे. दुचाकी रस्त्यात आडवी लावून दगड मारायचे. ही बाब तिने घरच्यांना सांगितली होती. घरच्यांनी दोन्ही मुलांना समजावून सांगितले. मात्र, त्यांच्यात काहीच फरक पडला नाही. २ एप्रिलला हर्षदा परीक्षेला जात असताना दोघांनी तिला ‘आमच्या सोबत चल. नाहीतर, परीक्षेला जाऊ देणार नाही,’ असा दम दिला. घाबरलेल्या हर्षदाने हा प्रकार घरी सांगितला होता. ५ एप्रिलला पेपर सुटल्यानंतर हर्षदा घरी आली. तणावात असलेल्या हर्षदाने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

Web Title: She ended her life by getting tired of the vagrants

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here