Home नांदेड नदीपात्रात बुडून काकूसह दोन पुतण्यांचा मृत्यू

नदीपात्रात बुडून काकूसह दोन पुतण्यांचा मृत्यू

Breaking News | Nanded: पैनगंगा नदीपात्रात बुडून काकूसह त्यांच्या दोन चिमुकल्या पुतण्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना.

Aunt and two nephews died after drowning in the river

आष्टा (जि.नांदेड) : माहूर तालुक्यातील पडसा या गावापासून जवळच असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील कवठा बाजार (ता. आर्णी) येथे पैनगंगा नदीपात्रात बुडून काकूसह त्यांच्या दोन चिमुकल्या पुतण्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना १३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. वाळू तस्करांवर कारवाईच्या मागणीसाठी नातेवाइकांनी २० तास मृतदेह जागेवरून उचलले नाहीत. अखेर आर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ एप्रिल रोजी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रतीक्षा प्रवीण चौधरी (३५), अक्षरा नीलेश चौधरी (१२) आणि आराध्या नीलेश चौधरी (११) अशी मृतांची नावे आहेत. पूजेतील निर्माल्य विसर्जन करण्यासाठी १३ एप्रिल रोजी प्रतीक्षा चौधरी त्यांच्या पुतण्या अक्षरा आणि आराध्या यांना घेऊन पैनगंगा नदीवर गेल्या होत्या.

यावेळी इतर दोन महिलाही त्यांच्यासोबत होत्या. निर्माल्य विसर्जन करीत असताना एका चिमुकलीचा तोल जाऊन ती डोहात पडली. तिला वाचविण्यासाठी मदतीला धावलेली दुसरी मुलगीदेखील डोहात बुडत असल्याचे पाहून काकूने मदतीसाठी डोहात उडी घेतली आणि त्याही बुडाल्या.

सोबत असलेल्या दोन महिलांनी ही माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी नदीपात्राकडे धाव घेतली; परंतु तोपर्यंत मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आले.

नदीपात्रातच गावकऱ्यांचा ठिय्या

बेसुमार वाळू उपसा केल्याने पैनगंगा नदीपात्रात खोल खड्डे खड्डे झाले आहेत. त्यामध्ये पाण्याचा अंदाज न आल्यानेच तीन जीव गमवावे लागले. यामुळे

वाळू माफियांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. तब्बल २० तासांपेक्षा अधिक काळ ग्रामस्थांनी मृतदेह नदीपात्राजवळच ठेवून ठिय्या मांडला. रविवारी दुपारी आर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक केशव ठाकरे यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर मृतदेह आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

Web Title: Aunt and two nephews died after drowning in the river

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here