Home संगमनेर संगमनेर: लिफ्टमधील कॅमेरा खाली केल्याच्या कारणावरून महिलेला शिवीगाळ

संगमनेर: लिफ्टमधील कॅमेरा खाली केल्याच्या कारणावरून महिलेला शिवीगाळ

Breaking News | Sangamner: लिफ्टमधून खाली येत असताना लिफ्टमध्ये असलेला कॅमेरा खाली केल्याच्या कारणावरून महिलेला शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याची घटना.

Woman abused for lowering camera in lift

संगमनेर : पतीसोबत लिफ्टमधून खाली येत असताना लिफ्टमध्ये असलेला कॅमेरा खाली केल्याच्या कारणावरून महिलेला शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याची घटना रविवारी (दि.०७) रात्री १२:३० वाजेच्या सुमारास साई श्रद्धा चौकातील एका कॉलनीत घडली होती. याप्रकरणी शनिवारी (दि.१३) महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
यश सातपुते, आकाश सातपुते, नारायण सातपुते, सोनू सातपुते, गणेश आहिरे, संकेत उनवणे (सर्व रा.
संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या सहा जणांची नावे आहेत. त्याच्या विरोधात २९ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, महिला आणि तिचा पती लिफ्टमधून खाली येत होते. लिफ्टमध्ये असलेला कॅमेरा खाली केल्याच्या कारणावरून महिलेला आम्ही प्रतिष्ठित घराण्यातील आहोत. असे म्हणत तिला जातीवाचक बोलण्यात आले. तुम्ही माफी मागा नाहीतर उद्या तुमच्या घरी येऊन नाष्टा करू असे म्हणत महिलेला शिवीगाळ करत दमदाटी केली, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Woman abused for lowering camera in lift

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here