Home बुलढाणा मिरवणुकीत नाचताना युवकाची चाकूने वार करून हत्या

मिरवणुकीत नाचताना युवकाची चाकूने वार करून हत्या

Breaking News | Buldhana Crime: मिरवणुकीत नाचताना अज्ञात आरोपींनी युवकावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केल्याची घटना.

youth was stabbed to death while dancing in a procession

बुलढाणा: मिरवणुकीत नाचताना अज्ञात आरोपींनी युवकावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या (Murder) केली ही घटना १४ एप्रिल रोजी रात्री घडली आशुतोष संजय पडघान (वय २४, जुना अजिसपूर रोड, बुलढाणा) असे मृतकाचे नाव आहे या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तसेच आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत पोलिसांनी सांगितले.

 बुलढाणा शहरातून १४ एप्रिल रोजी जयंतीउत्सवानिमित्त मिरवणुक काढण्यात आली होती या मिरवणुक जयस्तंभ चौकात येत असताना आशुतोष पडघान याच्यावर अज्ञात आरोपींनी चाकूने वार केले तसेच त्याला जखमी अवस्थेत बाजार रस्त्यावरून रुग्णालयात दाखल करण्यात आले जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते दरम्यान उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आशुतोष पडघान हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे त्यामुळे, जुन्या वैमनस्यातून त्याची. हत्या झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे या प्रकरणी कुणाल सुभाष निकाळजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास बुलढाणा शहर पोलीस करीत आहेत.  

Web Title: youth was stabbed to death while dancing in a procession

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here