Home अहमदनगर Crime: जिल्ह्यातील या नगराध्यक्ष वर गुन्हा दाखल, हे आहे कारण

Crime: जिल्ह्यातील या नगराध्यक्ष वर गुन्हा दाखल, हे आहे कारण

mayor vijay auti filed a crime parner

पारनेर| Parner Crime: पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजय औटी यांनी पाणी पुरवठा अभियंता सचिन राजभोज यांना मारहाण केल्याप्रकरणी मुख्याधिकारी डॉ. सुनिता कुमावत यांनी पारनेर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीनुसार औटी यांच्या विरोधात शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी (दि.5) सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला होता. नगराध्यक्ष विजय औटी हे काही नगरसेवकांसह पारनेर शहराला पाणीपुरवठा संदर्भात चर्चा करत होते. शहराला पाणीपुरवठा करणार्‍यां जुन्या मोटारी किती आहेत. याची माहिती मागविली होती. अनेकदा माहिती मागूनही अभियंता राजभोज यांनी ती दिली नाही. यावरून दोघांत शाब्दिक चकमक झाली. याचे रूपांतर थेट हाणामारीत होऊन औटी यांनी राजभोज यांना मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता.

बुधवारी (दि.6) मुख्याधिकारी डॉ. सुनिता कुमावत यांनी याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सपोनि.राजेश काळे करत आहेत.

पारनेर नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष औटी यांनी अभियंता राजभोज यांना मारहाण (Beaten) व शिवीगाळ करण्याचा प्रकार झाल्यानंतर कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन केले होते. याबाबत जिल्हाधिकारी यांना डॉ.सुनिता कुमावत यांनी माहिती दिली त्यानंतरच ही फिर्याद दिली गेली.

Web Title: mayor vijay auti filed a crime parner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here