Home महाराष्ट्र Suicide: पोलीस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide: पोलीस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या

Police constable commits suicide by hanging

सांगली | Sangali: सांगलीत एका पोलीस हवालदाराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)  केल्याची घटना रात्री उशिरा घडली असून आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे.

सांगलीतील विश्रामबाग पोलीस लाईनमध्‍ये राहत असलेले रामचंद्र बिरणगे (वय ४६) असे पोलीस हवालदाराचे नाव आहे.  त्यांनी गळफास घेतल्याचे आज सकाळी उघडकीस आले. रामचंद्र बिरणगे हे सांगली शहर पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत होते.

4 दिवसांपूर्वी त्यांच्या घरी चोरी झाली असल्याची फिर्याद त्यांच्या पत्नी आरती यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात दिली होती. याबाबत त्यांनी सुजाता तानाजी हेगडे या संशयित महिलेविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार सुजाता हेगडे या महिले विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

या घटनेनंतर रामचंद्र बिरणगे यांनी गुरुवारी मध्यरात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. ही घटना आज शुक्रवारी सकाळी समोर आली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात अद्याप नोंद नाही.

Web Title: Police constable commits suicide by hanging

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here