Home अहमदनगर अहमदनगर: मित्राबरोबर पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

अहमदनगर: मित्राबरोबर पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

schoolboy who went for a swim with a friend drowned in a well

Shrigonda | श्रीगोंदा: मित्राबरोबर पोहायला गेलेल्या केतन शशिकांत लोंढे या १४ वर्षीय केतन शशिकांत लोंढे या १४ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून (drowned) मृत्यू झाल्याची घटना घडली. तालुक्यातील काष्टी येथे ही घटना घडली.

केतन सकाळी सात ते साडे बारा वाजेपर्यंत शाळेत होता. शाळा सुटल्यावर दुपारी एक वाजता आठ ते दहा मुले राहुल नलवडे यांच्या शेतातील विहिरीवर पोहायला गेले. केतन हा नुकताच पोहायला शिकला होता. दोन तास पोहून झाल्यावर केतन पुन्हा विहिरीत गेला. तो कोठे दिसेना म्हणून अमोल मोटे, जीवन कापडे, अमोल देशमुख गवते, यांनी विहिरीत उड्या घेऊन त्याचा शोध घेतला. परंतु नुकतेच घोडचे पाणी आवर्तन येऊन गेल्याने विहिरीची पाणी पातळी वाढलेली असल्याने तरुणांना पाण्यात खोलपर्यंत जाता आले नाही. यावेळी अनेकांची खात्री झाली की, केतन बुडाला. अधिकाऱ्यांना विनंती करून वीज आल्यावर विहिरीवर पाच विद्युत पंप जोडून पाणी उपसले. सायंकाळी चार वाजता केतनचा मृतदेह विहिरीत सापडला. त्याच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: schoolboy who went for a swim with a friend drowned in a well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here