Home अहमदनगर Betting: अहमदनगर, आयपीएल मॅचवर सट्टा, चौघांवर गुन्हा दाखल

Betting: अहमदनगर, आयपीएल मॅचवर सट्टा, चौघांवर गुन्हा दाखल

IPL match betting, four charged

अहमदनगर | Ahmednagar Crime: शहरात मोठ्या प्रमाणात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा (Betting) लावला जात असल्याचे प्रकार घडत आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पटवर्धन चौकात कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली. या सट्ट्याप्रकरणी चौघांविरूध्द कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे.  त्यांच्याविरूध्द मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

विशाल आश्विनकुमार आनंद (वय 25 रा. पटवर्धन चौक, अहमदनगर), दीपक रमेश शर्मा (रा. पाईपलाइन रोड, अहमदनगर), अक्षय घोसके (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) व मोहन जोशी (पूर्ण नाव माहिती नाही. रा. तारकपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलीस शिपाई अमोल गाढे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्याकडून मोबाईल, दुचाकी असा 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पटवर्धन चौकात आयपीएल मॅचवर सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार  त्यांनी पोलीस अंमलदार रवींद्र टकले, संतोष गोमसाळे व गाढे यांना कारवाईच्या सूचना दिल्या. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मुद्देमाल काढून दिला व इतर दोघांच्या नावाची कबुली दिली. आणखी या जुगारात कोणी सामील आहे का याची चौकशी पोलीस करीत आहे.

Web Title: IPL match betting, four charged

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here