Home Accident News Accident: घाटात ट्रकचा विचित्र अपघात; चालक जागीच ठार

Accident: घाटात ट्रकचा विचित्र अपघात; चालक जागीच ठार

truck accident in Ghats; The driver was killed on the spot

पेठ: नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्गावर पेठच्या नजिक कोटंबी घाटात एका वळणावर ट्रक पलटी झाल्याने अपघात (Accident) झाला. या अपघातात चालक ठार झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी (दि.8) पहाटेच्या सुमारास गुजरातकडून नाशिककडे जाणारा अवजड ट्रक (क्रमांक केए 32 डी 8396) कोटंबी घाटातील नेहमीच्या ब्रेक फेल पॉईटवर वळणावरील कठडा तोडून खोल जागी कोसळला. यामध्ये ट्रकचालक अमरीश शरप्पा (32) रा. गुलबर्गा, कर्नाटक हा जागीच ठार झाला. पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देत मयत झालेल्या चालकाला बाहेर काढून पेठच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत पेठ पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: truck accident in Ghats; The driver was killed on the spot

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here