Home राहुरी अल्पवयीन मुलीच्या अंगाला नको तिथे हात लावून विनयभंग

अल्पवयीन मुलीच्या अंगाला नको तिथे हात लावून विनयभंग

Molestation of a minor girl by touching her body

राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द परिसरातील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अंगाला नको तिथे हात लावून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत विनयभंग (Molestation)  केल्याची घटना  दि. 6 एप्रिल रोजी सायंकाळी राहुरी खुर्द ते राहुरी शहर दरम्यान घडली.

याबाबत माहिती अशी की, दि. 6 एप्रिल रोजी फिर्यादीचे चारचाकी वाहन खराब झाले होते. ते वाहन फिर्यादीने नितीन शहाणे यांच्या दुकानासमोर लावले होते. गाडी रिपेअर करण्यासाठी फिटर घेऊन येऊ, असे नितीन शहाणे यांनी सांगितले. त्यानुसार नितीन शहाणे हे त्या अल्पवयीन मुलीला घेऊन त्यांच्या मोटारसायकलवर राहुरी खुर्द येथील बॅटरीच्या दुकानात गेले. तेथून ते फिटर घेऊन राहुरीकडे येत होते.

सायंकाळी साडेपाच ते सव्वासहा वाजण्याच्या सुमारास राहुरी खुर्द येथील बॅटरी दुकान ते राहुरी शहरातील नवीपेठ भागातील अलंकार दुकान दरम्यान नितीन शहाणे हे मोटरसायकल चालवित होते. त्यांच्या पाठीमागे ती 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बसली. तिच्या पाठीमागे आरोपी बसला होता. त्यावेळी आरोपीने तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. घरी गेल्यानंतर त्या मुलीने घडलेला प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितला.

त्या मुलीच्या आईने राहुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली असून  दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मोबीन अहमद शेख रा. राजवाडा, कब्रस्थान रोड, राहुरी याच्या विरोधात विनयभंगासह बालकांचे लैंगीक अत्याचार कायदा 2012 चे कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक  तपास पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा हे करीत आहेत.

Web Title: Molestation of a minor girl by touching her body

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here