अल्पवयीन मुलीवर दोघांनी केला लैंगिक अत्याचार, वाढदिवसाचा केक कापण्याचा बहाण्याने फसवलं!
Breaking News | Pune Crime: अल्पवयीन कॉलेज तरुणीवर दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार.
पुणे: पुण्यातील हडपसर येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन कॉलेज तरुणीवर दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मांजरी परिसरातील नदीपात्रात हा प्रकार घडला. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरोधात पोस्को कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अनुराग साळवे आणि गणेश म्हेत्रे असे अत्याचार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, वाढदिवसाचा केक कापण्याचा बहाणा करून पिडीत तरुणीच्या मैत्रीणीचे मित्र असलेल्या दोघा नराधम तरुणांनी अल्पवयीन मुलीवर मांजरीतील निर्जन स्थळी लैंगिक अत्याचार केला व तिला तिथेच सोडून दिले. आरोपींनी पीडित तरुणीला दुचाकीवरून रात्रीच्या सुमारास नदीपात्रामध्ये नेले. त्याठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार करून रात्रभर तिला नदीपात्रात सोडून दिले.
10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका – Education Portal
याप्रकरणी या दोन्ही आरोपी विरोधात पुण्यातील हडपसर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुणालाही सांगितल्यास तुला जीवे मारू, अशी धमकी देखील पीडितेला दिली. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: minor girl was sexually assaulted by two, tricked on the pretext of cutting her birthday cake
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study