Home महाराष्ट्र Monsoon 2022: मोठी बातमी! मान्सून केरळमध्ये दाखल, राज्यात पावसाचा इशारा  

Monsoon 2022: मोठी बातमी! मान्सून केरळमध्ये दाखल, राज्यात पावसाचा इशारा  

Monsoon 2022 arrives in Kerala

मुंबई | Monsoon 2022: अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे. यंदा वेळेआधी मान्सूनचं केरळमध्ये आगमन झालं आहे.

राज्यात मान्सूनपूर्व पाऊस पडत होता. मात्र आता केरळमध्ये मान्सून वेळेआधी दाखल झाल्याने शेतकऱ्यांसह उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

हवामान विभागाकडून मान्सूनबाबत सर्वात मोठी माहिती हाती आली आहे. मान्यून वेळेआधी दाखल झाल्याने शेतकरीही सुखावला आहे. महाराष्ट्रात देखील लवकरच मान्सून दाखल होईल अशी आशा व्यक्त होत आहे.

1 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र 29 मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. उद्यापासून राज्यात काही भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी होण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Web Title: Monsoon 2022 arrives in Kerala

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here