Home औरंगाबाद Crime | प्रेयसीचे लग्न झाल्यानंतर जुन्या प्रियकराने प्रेयसीचे अश्लील फोटो केले व्हायरल

Crime | प्रेयसीचे लग्न झाल्यानंतर जुन्या प्रियकराने प्रेयसीचे अश्लील फोटो केले व्हायरल

Crime boyfriend takes porn photos of girlfriend after his girlfriend's wedding goes viral

औरंगाबाद | Aurangabad:  १९ वर्षीय विवाहितेचे लग्नापूर्वी काढलेले सोबत फोटो सोशियल मेडीयावर टाकून तिला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी एका प्रियकरावर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात हा गुन्हा (Crime filed) दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे. (Aurangabad Crime News)

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज महानगर परिसरात राहत असलेली 19 वर्षीय तरुणी गेल्यावर्षी बुलडाणा जिल्ह्यात मामाच्या गावाकडे गेली होती. दरम्यान तिची ओळख तिथे रहाणाऱ्या सुधाकर गजानन निकम तरुणासोबत झाली. पुढे त्यांच्यात मैत्री आणि त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांनतर मुलगी आई-वडिलांकडे वाळूजला पुन्हा परत आली. पण त्यांनतरही दोघेही मोबाईलवरून एकमेकांच्या संपर्कात राहत होते. तसेच प्रियकर अधूनमधून तिला भेटण्यासाठी वाळूजला येत असे. दोघांत शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. यावेळी सुधाकरने दोघांचे खासगी क्षणाचे फोटो व व्हिडिओ (Private porn Photo and video ) मुलीला नकळत काढले.

पुढे मुलीच्या वडिलांनी सुधाकरचा लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला. त्याने ते फोटो व्हिडीओ त्यांना व्हाट्सअपवर पाठवत फेसबुकवर व्हायरल केले. म्हणून मुलीच्या वडिलांनी सुधाकरला समज दिली. पण त्यांनतर सुद्धा सुधाकर मुलीला फोन करून लग्न कर अन्यथा आत्महत्या (Suicide) करेल अशा धमक्या (Threaten) देत होता. त्यामुळे मुलीचे मानसिक संतुलन बिघडल्याने कुटुंबीयांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मुलीसाठी स्थळ पाहून तीच लग्न करण्याचं आई-वडिलांनी ठरवलं. त्यानुसार साखरपुडा सुद्धा करण्यात आला. त्यांनतरही सुधाकरने लग्न तोडण्याच्या धमक्या देत मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यावेळी मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र मुलीचे लग्न होऊन दोन महिने झाल्यावर देखील सुधाकर सतत ब्लॅकमेल करत असल्याने मुलीच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime boyfriend takes porn photos of girlfriend after his girlfriend’s wedding goes viral

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here