Home नाशिक पुणे नाशिक महामार्गावर टेम्पो दुचाकी भीषण अपघात, महाविद्यालयीन तरुणी ठार, दोघी मैत्रिणी...

पुणे नाशिक महामार्गावर टेम्पो दुचाकी भीषण अपघात, महाविद्यालयीन तरुणी ठार, दोघी मैत्रिणी जखमी- Accident

Accident Tempo two-wheeler crashes on Pune-Nashik highway, college girl killed

Sinnar | सिन्नर: पुणे नाशिक महामार्गावर नांदुर-शिंगोटे शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोवर दुचाकी धडकून झालेल्या अपघातात (Accident) 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणी ठार झाली तर तिच्यासोबत स्कुटी वरून प्रवास करणाऱ्या दोघी मैत्रिणी गंभीर जखमी झाल्या आहेत. शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना आहे. या प्रकरणी रात्री उशिरा वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली

साक्षी अनिल खैरनार (१८) राहणार चास ता. सिन्नर असे या अपघातात मयत झालेल्या विद्यार्थिनींचे नाव आहे. सविता सूर्यभान सांगळे रा. चास, वर्षा सुभाष जगताप रा. सोनेवाडी या दोघी गंभीर जखमी झाल्या.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्कूटी (क्रमांक एमएच 15 / एचएल 1479) वरून संगमनेर येथून नांदुरशिंगोटेकडे येत असताना खंडोबा टेकडी जवळ महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर ट्रक (क्र. एचआर 61 / डी 9843) वर स्कुटीने जोराची धडक दिली. या अपघातात साक्षीचा जागेवरच मृत्यू झाला. तर तिच्यासोबत प्रवास करणाऱ्या दोघी जखमी झाल्या आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच नांदुर-शिंगोटे दूर क्षेत्रातील पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक तरुणांनी धाव घेतली जखमी अवस्थेतील तीनही तरुणींना संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच साक्षीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर रात्री उशिरा येथे साक्षी वर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर सविता व वर्षा या दोघींची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Accident Tempo two-wheeler crashes on Pune-Nashik highway, college girl killed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here