Home अहमदनगर Murder Case: घरगुती वादातून मुलानी केली वडिलांची हत्या

Murder Case: घरगुती वादातून मुलानी केली वडिलांची हत्या

murder case baburav

कोपरगाव | Murder Case: घरगुती वादातून मुलांनी आजोबाला सोबत घेऊन वडिलांच्या डोक्यात टणक वस्तू मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव शिवारात १० जून रोजी रात्री घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सुरेगाव कोळवाडी थडी परिसरात रस्त्याच्या कडेला गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास नागरिकांनी मृतदेह व एक मोटारसायकल पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने नागरिकांनी कोपरगाव तालुका पोलिसांना माहिती दिली.

कोपरगाव तालुका पोलीस अधीक्षक दौलत जाधव यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. मृतदेह सुरेगाव येथील बाबुराव निकम या व्यक्तीचा असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा पंचानामा करत मृतदेह कोपरगाव येथे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

मयत व्यक्तीचे घरगुती वादातून कुटुंबीयासोबत भांडण झाले होते.  त्यामुळे त्या व्यक्तीची हत्या झाली असावी अशी चर्चा आहे. तसेच सदर व्यक्ती ही वीट भट्टीवर कामावर जात असल्याने घरची परिस्थिती हालाखीचे असून रात्रीच्या वेळी कुटुंबीयासोबत काही कारणावरून वाद झाले होते.

या घटनेबाबत लताबाई बाबुराव निकम या महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तिचा मुलगा आणि सासरा यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कोपरगाव पोलीस करीत आहे.  

Web Title: Murder Case child kills father over domestic dispute

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here