Home अहमदनगर बांधाच्या वादावरून पती पत्नीला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

बांधाच्या वादावरून पती पत्नीला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

Husband wife beats dispute crime filed

कोपरगाव | Crime: बांधावरील झाडाझुडपांच्या वादावरून पती पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथे घडली. याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी भाऊसाहेब त्र्यंबक पाडेकर यांनी फिर्याद दिली आहे. यामध्ये म्हंटले आहे की, आरोपी गणपत गंगाधर गागरे, गंगाधर चांगदेव गागरे, माया गणपत गागरे, कांताबाई गंगाधर गागरे यांनी मारहाण केली,

पाडेकर व गागरे यांच्या जमिनी शेजारी लगत असून दोन्ही जमिनीदरम्यान बांध गेला. झाडे झुडपे यांची सावळी फिर्यादीच्या पिकावर पडते. त्यामुळे पाडेकर याने गागरे यांना झाडे झुडपे काढून घ्या अशी विनंती केली. त्यावरून गणपत गागरे यांनी पाडेकर यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्यास चावा घेत जखमी केले. तसेच मारहाण करण्यात आली. याप्रकरणी निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल म्हस्के हे करीत आहे.  

Web Title: Husband wife beats dispute crime filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here