Home अहमदनगर प्रेमप्रकरण: तरुणीसोबत लग्न न केल्याने तिच्या मुलाचे अपहरण

प्रेमप्रकरण: तरुणीसोबत लग्न न केल्याने तिच्या मुलाचे अपहरण

Crime Filed Unable to marry the young woman, one of her children ran away

अहमदनगर | Crime: औरंगाबाद येथून सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी १२ तासांत जेरबंद केले आहे.

याबाबत माहिती अशी की, दिनांक ९ जून रोजी औरंगाबाद येथील बजाज नगरमध्ये राहणारे परशुराम नवनाथ रासकर यांच्या नातेवाईकांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना माहिती दिली की, परशुराम रासकर यांचा सहा वर्षाचा मुलगा अभिनव यास सागर आळेकर रा. श्रीगोंदा याने परशुराम रासकर यांची पत्नी हिचेसोबत प्रेमसंबंध असल्याने तु माझ्यासोबत लग्न कर नाहीतर मुलास पळवून नेईन असे म्हणून अभिनव यास त्याचेकडील स्विफ्ट कार मध्ये अपहरण करून श्रीगोंद्याकडे येत आहे. थोड्याच वेळापूर्वी अहमदनगर कायनेटिक चौकातून दौंड रोडने गेला आहे, अशी माहिती दिली,

या माहितीनुसार पोलीस निरीक्षक ढिकले यांनी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना नगर दौंड रोडवर पारगाव फाटा येथे नाकाबंदी करण्याचे आदेश दिले व तात्काळ तेथे रवाना केले. दरम्यान सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार स्विफ्ट गाडी ही अहमदनगरकडून दौंड कडे जात दिसल्याने ती थांबवून त्यातून आरोपी सागर गोरख आळेकर रा. श्रीगोंदा यास त्याने पळवून आणलेल्या सहा वर्षाच्या अभिनवसह ताब्यात घेतले. मुलास त्याचे आई वडिलांच्या ताब्यात दिले. आरोपीस पुढील कार्यवाहीसाठी औरंगाबाद शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.  

Web Title: Crime Filed Unable to marry the young woman, one of her children ran away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here