Home नाशिक तरुणाला थेट रेल्वेतून खाली फेकलं, नाशकात भयंकर घडलं

तरुणाला थेट रेल्वेतून खाली फेकलं, नाशकात भयंकर घडलं

Breaking News | Nashik Murder Crime: रेल्वेत मोबाइल चोरी करीत असल्याच्या संशयावरून तरुणाला रेल्वेतून खाली फेकल्याने त्याचा मृत्यू (Death) झाल्याची घटना.

Murder Case young man was thrown directly from the train, something terrible happened in the destroyer

मनमाड: धावत्या रेल्वेत मोबाइल चोरी करीत असल्याच्या संशयावरून तरुणाला रेल्वेतून खाली फेकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. १५ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी गुरुवारी (दि. २९) मनमाड शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अजयकुमार साहू (रा. चेनपूरा, मध्य प्रदेश) यांनी फिर्याद दाखल केली असून दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १५ फेब्रुवारी रोजी रात्री मनमाड रेल्वे स्थानकात पंजाब मेल रेल्वेगाडी उभी असताना अनोळखी इसमाने रोहीतकुमार मुकेश गोस्वामी याला मोबाइल चोरी केल्याच्या संशयावरून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. मध्यस्थी करण्यास गेलेल्या अजय यांनाही शिवीगाळ केली आणि संशयिताने मयत रोहीतकुमार याच्या वडिलांना फोन करून तुमच्या मुलाला रेल्वेखाली फेकतो अशी धमकी दिली. त्यानंतर तो रोहीतला सोबत घेऊन गेला. त्याने रोहीतला रेल्वेतून बाहेर फेकून ठार मारले, असे साहू यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार मनमाड शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक लांडगे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Murder Case young man was thrown directly from the train, something terrible happened in the destroyer

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here