Home चंद्रपूर तिहेरी हत्याकांड! पतीकडून पत्नी, दोन मुलींची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या

तिहेरी हत्याकांड! पतीकडून पत्नी, दोन मुलींची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या

Breaking News | Chandrapur Crime: निर्दयी पतीने पत्नी आणि पोटच्या दोन मुलींची कुऱ्हाडीने वार करीत निर्घृण हत्या केल्याची घटना.

Triple murder Brutal ax killing of wife, two daughters by husband

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातून एक हादरवणारी तिहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. चंद्रपूरच्या नागभिड तालुक्यात निर्दयी पतीने पत्नी आणि पोटच्या दोन मुलींची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. या भयंकर घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रपूर जिल्ह्यात निर्दयी पतीने पत्नी आणि दोन मुलींची कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागभिड तालुक्यातील मौशी गावात हा हत्येचा थरार घडला. अंबादास तलमले (वय, ५०) असे आरोपीचं नाव आहे.

आरोपीने पत्नी अल्का तळमले (वय,४०) मोठी मुलगी प्रणाली तलमले, (वय,१९) आणि छोटी मुलगी तेजू तलमले (वय, १७) या तिघांचीही कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या केली. आज पहाटे अंबादास आणि अलका यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. याच भांडणाच्या रागातून रात्री सर्व झोपले असताना आरोपीने तिघींवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली.

याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. घरगुती वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक माहिती समोर आली आहे.  आरोपीला नागभीड पोलिसांनी अटक केली असून घटनेचा तपास सुरू आहे.

Web Title: Triple murder Brutal ax killing of wife, two daughters by husband

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here