Home अकोले अकोलेत एसटी’कडून प्रवाशांच्या जिवाशी खेळ, अकोलेकर संतप्त

अकोलेत एसटी’कडून प्रवाशांच्या जिवाशी खेळ, अकोलेकर संतप्त

Breaking News | Akole Bus: अकोले आगारातून प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरु.

Playing with the lives of passengers from Akolet ST

अकोले: अकोले येथील बसस्थानकाचा कारभार असून अडचण नसून खोळंबा अशीच सुरु आहे. अकोले आगारातील बस कोठेही बंद पडत असल्याने प्रवाशांना पायपीट करावी लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून अकोले आगारातून प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

अकोले आगाराची बस राजूर येथून सुमारे ५० प्रवाशांना घेऊन कुमशेत येथे सकाळी दहा वाजता निघाली होती. या बसच्या स्टेरिंगमध्ये ऑइल नसल्याने ती बंद पडली. त्यामुळे सर्वच प्रवाशांना सुमारे दहा किलोमीटर पायपीट करावी लागली. या घटनेअगोदर एक दिवस अंबित गावामध्ये बस पोचली. त्यानंतर या बसचे टायर फुटल्याची घटना घडली आहे.

अकोले तालुक्यात घाट रस्ते असताना देखील जुन्या खराब बस पाठवून आगार व्यवस्थापक आदिवासी प्रवासाच्या जिवाशी खेळ करत आहे, असा आरोप गंगाराम धिंदळे यांनी केला आहे.

एसटी बस नसल्याने अकोले तालुक्यात खासगी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खासगी वाहनांवर बसून प्रवासी प्रवास करीत आहेत. जर घाटामध्ये एखादी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असावा सवाल केला जात आहे.

कुमशेत, पाचनई या भागात जाणाऱ्या बस रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे बस सातत्याने पंक्चर होत आहेत. त्यामुळे काही दिवस या भागातील बस फेऱ्या बंद करणार आहे. सध्या ४३ बस आगारात उपलब्ध आहेत. त्यातील काही बंद आहेत. त्यामुळे बस सोडण्याचे नियोजन करताना अडचणी येत आहेत. नवीन बसचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठविला आहे- सोनाली संगमकर, आगार व्यवस्थापक.

Web Title: Playing with the lives of passengers from Akolet ST

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here