Home अहमदनगर Murder: अपहरण झालेल्या पाच वर्षीय मुलाचा खून

Murder: अपहरण झालेल्या पाच वर्षीय मुलाचा खून

Murder of abducted five-year-old boy

कुकाणे | Murder: देडगाव येथील सत्यम संभाजी थोरात याचे गेल्या बुधवारी अपहरण झाले होते. सत्यम थोरात या ५ वर्षीय मुलाचा मृतदेह देडगाव शिवारातच पोपट मुंगसे यांच्या शेतात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

गेल्या बुधवारी सत्यमचे अपहरण झाल्याची तक्रार त्याचे वडील संभाजी थोरात यांनी दिली होती.  सत्यमचा मृतदेह आढळून आला आहे. चार आरोपींना अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. तर आता पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाने देडगावात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

प्रमोद अंकुश थोरात (वय 42), विनायक उर्फ विनोद अंकुश थोरात (वय 44), गणेश शेषराव मोरे (वय 32) व रमेश शेषराव मोरे वय (वय 30) यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात हे करीत आहे.

दरम्यान गुन्हा दाखल झालेल्या चारही आरोपींना नेवासा पोलिसांनी अटक केली असून त्यांना काल नेवासा न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

Web Title: Murder of abducted five-year-old boy

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here