Home क्राईम Crime news: संगमनेर तालुक्यात दलित सरपंचाना घातला चपलाचा हार, गुन्हा दाखल

Crime news: संगमनेर तालुक्यात दलित सरपंचाना घातला चपलाचा हार, गुन्हा दाखल

Crime News Sangamner Dalit sarpanch wore a slipper necklace

संगमनेर | Crime News: दलित सरपंचाचा आम्ही असाच सत्कार करतो असे म्हणत उच्चभ्रू समाजातील व्यक्तींनी संगमनेर तालुक्यातील कसारे येथील सरपंचास चपलांचा हार घालून अपमान केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी २६ ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी कसारे गावाचे सरपंच महेश अण्णासाहेब बोराडे रा. कसारे यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णाजी सूर्यभान कार्ले व मच्छिंद्र हिरामण कार्ले रा. दोघेही कसारे असे आरोपींची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, मंगळवारी दुपारी सरपंच हे आपल्या मुलीस तळेगाव येथील दवाखान्यात घेऊन जात असताना नांदूर शिंगोटे ते लोणी जाणाऱ्या रोडवर वडझरी परिसरात वरील दोघांनी सरपंचाच्या गाडीस गाडी आडवी लावली. एका जुन्या चपलांचा हार काढून तो सरपंचाच्या गळ्यात टाकण्यात आला. आम्ही महारांच्या सरपंचाचा असाच सत्कार करतो असे म्हणत त्यांचा पानउतारा केला असे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी   कृष्णाजी सूर्यभान कार्ले व मच्छिंद्र हिरामण कार्ले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उप अधीक्षक राहुल मदने हे करीत आहे.

Web Title: Crime News Sangamner Dalit sarpanch wore a slipper necklace

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here