Home अहमदनगर चांगल्या आरोग्यासाठी गैरमार्गाने नव्हे तर कष्टाने कमावलेले खा: राज्यपाल कोश्यारी

चांगल्या आरोग्यासाठी गैरमार्गाने नव्हे तर कष्टाने कमावलेले खा: राज्यपाल कोश्यारी

Ahmednagar Bhagatsinh koshyari news Today

अहमदनगर | Ahmednagar: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज अहमदनगर जिल्ह्यात प्रवरानगर येथे प्रवरा ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटल भूमिपूजनसाठी आले. त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी राज्यपालांनी आयुर्वेद आणि योगाचे महत्व विषद करताना चरक यांनी पाळलेल्या एका पोपटाची गोष्ट त्यांनी सांगितली. चांगल्या आरोग्यासाठी गैरमार्गाने नव्हे तर कष्टाने कमावलेले खा असे तो पोपट सांगत असे. सध्याच्या काळात मात्र कसले पोपट जन्मले आहे काय माहिती? असा टोला त्यांनी लगाविला. या गोष्टीनंतर चांगलाच हशा झाला. त्यांचा रोख कोणाकडे होता यावरून चांगलीच चर्चा रंगली आहे.

.प्रवरा परिसराचे त्यांनी मनभरून कौतुक केले. ते म्हणाले, ‘मोजता येणार नाहीत एवढी शिक्षणाची केंद्र या संस्थेत आहेत. प्रवरेच्या काठी अतिशय रम्य असा परिसर आहे. वृद्धापकाळात येथेच येऊन रहावे, असे वाटते आहे. अशा संस्थेने आयुर्वेदासाठी घेतलेला पुढाकार महत्वाचा आहे. राजकीय क्षेत्रात काम करताना लोक टीका करत असतात. मात्र, त्यासोबत सामाजिक कार्याची जोड असेल तर पिढ्यानपिढ्या तुम्ही लोकांसोबत राहू शकता. विखे कुटुंब याचेच एक उदाहरण आहे.’ असेही राज्यपाल म्हणाले.

Web Title: Ahmednagar Bhagatsinh koshyari

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here