Murder: संगमनेर तालुक्यातील त्या महिलेचा खून, डोंगराच्या दरीत मृतदेह
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील शिरसगाव येथील पांढरे वस्ती येथील महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांच्या प्रयत्नांनंतर महिलेचा मृतदेह डोंगराच्या दरीत आढळून आला आहे. याप्रकरणी दोन संशियत यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सुनंदा कुंडलीक भोजणे वय ४५ रा. पांढरे वस्ती शिरसगाव असे या खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मयत सुनंदा भोजणे ही महिला पांढरी वस्ती शिरसगाव येथे एकटी राहत होती. तिच्या मुलीचे लग्न झालेले असून मुलगा नोकरीस आहे. सदर महिला हि ८ जानीवारीपासून गायब होती. याबाबत माहिती समजताच मुलगा दिनेश भोजणे हा शहापूर येथून शिरसगावला आला होता. त्याने आपली आई बेपत्ता असल्याची तक्रार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मुलगा व शेजाऱ्यांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ती मिळून आली नाही.
घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत पाहिले असता घरात सुकलेल्या रक्ताचे डाग आढळून आले. यांनतर मुलगा दिनेश याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चंद्रभान चांगदेव चौधरी रा. शिरसगाव व सुभाष नाना सूर्यवंशी रा. लिंगदेव यांचे आपल्या घरी येणे जाणे सुरु होते. अज्ञात कारणावरून या दोन जणांनी आईचे अपहरण करून खून केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेथे रक्ताचे डाग आढळून आले. पोलीस पथकाने शिरसगाव येथील डोंगरदर्यात पाहणी केली असता अथक प्रयत्नानंतर त्यांना तिचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला आहे. वरील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Murder of that woman in Sangamner taluka