Home अहमदनगर बालकामगारांना चटके देणाऱ्या बेकरी चालकाला अटक

बालकामगारांना चटके देणाऱ्या बेकरी चालकाला अटक

Rahuri Bekari Owner arrested for giving clicks to child laborers

राहुरी | Rahuri: मुळचा उत्तरप्रदेश राज्यातील रहिवासी असलेल्या राहुरी खुर्द येथील पवन यादव हा बेकरी चालक १४ ते १६ वयोगटातील बाल कामगारांना वेठबिगारी तसेच अंगाला चटके देऊन छळ करत असल्याचे उघड झाले असून राहुरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

उत्तरप्रदेश, बिहार येथील रहिवासी असलेले तीन बालकामगार राहुरी खुर्द येथील बेकरी चालकाकडे कामासाठी आणण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडून उपाशी पोटी काम करून घेणे, काम न केल्यास अंगास चटके देणे मारहाण करणे, अघोरी कृत्य प्रकार या पावन यादव नाराधमाकडून सुरु होता.

या मुलांच्या छळाची माहिती शनिवारी सायंकाळी मिळाल्याने राहुरी पोलिसांनी राहुरी खुर्द येथे जाऊन बेकरी चालकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

उत्तरप्रदेशातील दोन व बिहार राज्यातील एक असे १४ ते १६ वयोगटातील बालकामगार यांना अंगावर फाटलेले कपडे, अनके दिवसांपासून त्यांनी अंघोळ केलेली नाही अशी माहिती मिळाली. तसेच चटके दिल्याचे वन त्यांच्या अंगावर दिसून आले. मध्यरात्री उठवून या मुलांना कामाला लावत असे. दुपारपर्यंत जेवण न मिळण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. या बेकरी चालकाकडून वर्षभरापासून छळ सुरु होता.   

Web Title: Rahuri Bekari Owner arrested for giving clicks to child laborers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here