Home अहमदनगर ट्रॅक्टर व दुचाकीच्या धडकेत ग्रामपंचायत सदस्य जागीच ठार तर एक जखमी

ट्रॅक्टर व दुचाकीच्या धडकेत ग्रामपंचायत सदस्य जागीच ठार तर एक जखमी

Jamkhed Tractor motorcycle Accident one death 

जामखेड | Jamkhed: जामखेड तालुक्यातील कर्डूवाडी टेंभूरणी रोडवर तांबवे गावच्या शिवारात भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅक्टरने मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाला आहे. शनिवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

या अपघातात जामखेड तालुक्यातील हळगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य आजीनाथ खोटे यांचा जागीच मृत्यू झाला. तर उत्तम तात्याबा ढवळे हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर टेंभूरणी येथील पाटील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जामखेड तालुक्यातील हळगाव येथील आजीनाथ खोटे व उत्तम ढवळे हे दोघे दुचाकीहून हळगावाहून पंढरपूर येथे औषध आणण्यासाठी गेले होते. औषधे घेऊन दोघे सोलापूर पुणे हायवेवरून गावी परतत असतना करमाळा ब्रिज खालून जाण्याऐवजी चुकून कर्डू वाडी ब्रिज खालून कर्डूवाडी रोड बरेच पुढे गेले असता त्यांना रस्ता चुकल्याचे लक्षात आले. पुन्हा गाडी वळवून ते गावाकडे निघाले असता पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरने मोटारसायकलला जोराची धडक दिली. यामध्ये अजीनाथ खोटे याच्या जागीच मृत्यू झाला. तर उत्तम ढवळे हे गंभीर जखमी झाले आहे.  

Web Title: Jamkhed Tractor motorcycle Accident one death 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here