Home क्राईम गुंठामंत्र्याची दादागिरी: पोलीस ठाण्यातच पोलिसाला मारहाण

गुंठामंत्र्याची दादागिरी: पोलीस ठाण्यातच पोलिसाला मारहाण

Crime News Police beaten at the police station

पुणे | Crime News: दोघा जणांच्या भांडणातील दुसऱ्याची तक्रार अगोदर घेत असल्याच्या रागातून गुंठा मंत्र्याने पोलीस ठाण्यातच पोलिसाला धक्काबुकी व शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुंठामंत्री राहुल लक्षमण भरम वय ४८ रा. केळेवाडी, कोथरूड याला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे.

याआधी तीन चार पोलिसांना चोपले आहे, तुलाही सोडणार नाही अशी धमकी पोलीस कॉन्स्टेबलला देण्यात आली. एरंडवणा पोलीस ठाण्यात १५ जानेवारी रोजी साडे दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल भ्रम व राहुल वाघ यांच्यात वाद झाले होते. दोघेही तक्रार दाखल करण्यासाठी एरंडवणा पोलीस चौकीत आले असता पोलीस कॉन्स्टेबल कौस्तुब निढाळकर यांनी तक्रारी शांत राहून एका एकाने सांगा असे सांगत होते. राहुल भरम याला बाजूला बसायला सांगितले. त्यावेळी राहुल भरम याने तुम्ही त्याची तक्रार का अगोदर घेताय, तुम्ही मला बाजूला बसायला सांगता, मी कोण आहे तुम्हाला माहिती नाही. मी गुंठा मंत्री आहे. मी अगोदर तीन चार पोलिसांना मारले आहे. तुला सोडणार नाही. तु मला उद्या भेट सांगतो असे बोलून धमकी दिली.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कौस्तुब निढाळकर यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून राहुल भरम याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पडवळे हे करीत आहे.  

Web Title: Crime News Police has beaten at the police station

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here