Home श्रीगोंदा घारगाव शिवारात ट्रक व जीपच्या अपघातात दोघा जणांचा मृत्यू

घारगाव शिवारात ट्रक व जीपच्या अपघातात दोघा जणांचा मृत्यू

Near Ghargaon Accident Two Death 

श्रीगोंदा: नगर  दौंड रोडवरील घारगाव शिवारात निलगिरी हॉटेलजवळ महाराष्ट्र शासनाची जीप व एक खासगी ट्रक यांच्या भीषण अपघात झाला. या अपघातात अहमदनगर येथील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

माथाडी महामंडळातील निरीक्षक प्रभाकर निवृत्ती लोंढेकर वय ५७ रा. अहमदनगर व त्यांचा चालक अशोक पुंजाबा औटी वय ४८ रा. अहमदनगर असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नावे आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, माथाडी महामंडळातील निरीक्षक प्रभाकर निवृत्ती लोंढेकर हे राशीनवरून श्रीगोंदामार्गे नगरकडे जीपमधून चालले होते. ट्रकने समोरून येऊन बोलेरोला जोराची धडक दिली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती समजताच बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात इतका भीषण होता की, मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी गॅस कटरचा वापर करीत मृतदेह बाहेर काढले. गाडीचा चक्काचूर झाला आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Near Ghargaon Accident Two Death 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here