Home अहमदनगर तरुणाची लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Nevasa Young man commits suicide by hanging himself 

नेवासा | Nevasa: नेवासा तालुक्यातील पुनतगाव शिवारात एका २६ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. या युवकाने आत्महत्या का केली यामागचे कारण कळू शकले नाही. 

सुनील वामन पंडूरे असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पुनतगाव रस्त्याच्या कडेला असणाऱ्या उसाच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे.

बुधवारपासूनच हा तरुण घरातून बेपत्ता होता. परिसरात न आढळून आल्याने नेवासा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या युवकाने आत्महत्या का केली यामागचे कारण अजून समजू शकले नाही.

Web Title: Nevasa Young man commits suicide by hanging himself 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here