Home क्राईम संगमनेर तालुक्यातील घटना: सासऱ्याचा सुनेवर अत्याचार

संगमनेर तालुक्यातील घटना: सासऱ्याचा सुनेवर अत्याचार

Sangamner Taluka News Father-in-law's atrocities 

संगमनेर | Sangamner Taluka News: सून घरात एकटी असल्याचा फायदा घेत संधी साधून चुलत सासऱ्याने सुनेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे. ही घटना संगमनेर तालुक्यात घडली आहे.

संगमनेर तालुक्यातील एका गावात पिडीत महिला कुटुंबासोबत राहते. आरोपीच्या शेजारी शेजारी त्यांचे शेत आहे. दिनांक ८ मार्च सोमवारी महिला दिनी आरोपी शेतात गहू गोळा करण्यासाठी आले. गहू गोळा करून झाल्यानंतर दुपारी या पिडीत महिलेच्या घरी आले. घरात ही महिला एकटी असल्याची संधी साधत महिलेवर अत्याचार केला. यावेळी पिडीत महिलेने आरडाओरडा केला मात्र आजूबाजूला कोणीच नसल्याने मदत मिळाली नाही. मी तुमच्या मुलीसारखी आहे असे म्हणत विरोध केला मात्र आरोपीने बळजबरी करत अत्याचार करून तेथून पळून गेला. हा घडलेला सर्व प्रकार नवऱ्याला सांगितला. दुसऱ्या दिवशी आश्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुधाकर  मांडवकर व त्यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.

Web Title: Sangamner Taluka News Father-in-law’s atrocities 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here