Home अकोले शिक्षकच विदयार्थ्यांना समृद्ध करु शकतो-डॉ.सुधिर तांबे.

शिक्षकच विदयार्थ्यांना समृद्ध करु शकतो-डॉ.सुधिर तांबे.

महालक्ष्मी विदयालयाचे वार्षिक पारीतोषीक वितरण संपन्न.

पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी: विदयार्थ्यांना परीपुर्ण तसेच दर्जेदार शिक्षण देणे महत्त्वाचे असुन त्यासाठी शासनाने सर्व विद्यालये अनुदानीत करून मुलभुत हक्काची अंमलबजावनी इ.१२वी पर्यंत करावी. शिक्षकांना शासनाच्या दारात जाण्याची गरज आली नाही पाहीजे. कारण शिक्षकच विदयार्थ्यांना समृद्ध करू शकतो. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सदस्य डॉ. सुधिर तांबे यांनी केले.

अकोले तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा येथील महालक्ष्मी माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात वार्षिक पारीतोषीक वितरण समारंभ तसेच अटल टिंकरींग लॅब उद्घाटन सोहळा व इ.१०वी चा सदिच्छा समारंभ नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुधिर तांबे व्यासपिठावरुन बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अगस्ती रूरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड.वसंत मनकर होते. याप्रसंगी सेक्रेटरी मंगेश नवले, सरपंच सुमनताई आढळ, माजी उपसभापती मारूती मेंगाळ, माजी चेअरमन भास्कर कानवडे, म्हतारबा कासार, सुभाष बगनर, विनोद हांडे, हेमंत आवारी, सचिन खरात, सुनिल वाळुंज, विलास काळे, माधव बोऱ्हाडे, तुषार गायकर, अनिल गायकर, कैलास राहाणे, चांगदेव खेमनर,नवनाथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. सुधिर तांबे पुढे बोलताना म्हणाले कि, शासनाने जबाबदारी टाळता कामा नये. शिक्षणाचे महत्व कळाले पाहिजे. इंग्रजांच्या शिक्षणाला दोष न देता सत्याचा स्वीकार केला पाहीजे.विचारांची दिशा बदला दशा आपोआप बदलेल असे विचार व्यक्त करत विदयार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या पुष्पगुच्छाचे भरभरून कौतुक केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड.वसंत मनकर यांनी इतिहासाचे अवलोकन करा पण इतिहासात जास्त रममान होऊ नका. योग्य दृष्टीकोन असेल तर उभे राहणे शक्य आहे. त्यासाठी स्वावलंबी शिक्षण याप्रमाणे कृती करा.

यावेळी सुभाष बगनर, हेमंत आवारी, प्रा.सचिन लगड, विदयार्थी अदिती लगड, ऋषीकेश बेणके, प्रज्ञा कासार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगि अहमदनगर जिल्हा माध्यमिक सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक चांगदेव खेमनर, कैलास राहाणे, अण्णासाहेब ढगे, अनिल गायकर यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुनिल धुमाळ यांनी केले.

अहवालवाचनल तसेच सुत्रसंचलन रामदास कासार यांनी केले. तर तुकाराम भोर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परीश्रम घेतले.

वाचा: शिक्षण क्षेत्राबद्दल शासनाची उदासीनता: डॉ.तांबे

Website Title: News a teacher can enrich students

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here