Home अकोले राजूर प्रकल्पात सव्वा तीन कोटींचा अपहार: गुन्हा दाखल

राजूर प्रकल्पात सव्वा तीन कोटींचा अपहार: गुन्हा दाखल

राजूर(News): एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय राजूरमध्ये तत्कालीन प्रकल्प अधिकारी चंद्रकांत भारमल यांच्यावर पावणे तीन कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी चार वेगवेगळे, तर दुसरे प्रकल्प अधिकारी तानाजी पावडे यांच्यावरही ५० लाख रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा राजूर पोलिसांत दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यामध्ये तत्कालीन कर्मचारी, योजनांचे ठेकेदार, व्यापारी यांचाही समावेश आहे.

याबाबत राजूर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, सहायक प्रकल्प अधिकारी रोहिदास कोंडीबा साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन प्रकल्प अधिकारी चंद्रकांत भारमल याने संगनमत करून आदिवासी लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे, युनिट खरेदी पुरवठा या योजनेत शासकीय पदाचा दुरुपयोग करून सम्भंधित ठेकेदाराच्या मदतीने ४६ लाख ८० हजार रुपयांची शासनाची फसवणूक करून अपहार केला. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या गुन्ह्यात जानेवारी २००३ ते जून २००८ या कालावधीत आरोपी भारमल याने तत्कालीन सहायक प्रकल्प अधिकारी व अन्य कर्मचारी यांनी संगनमत करून शासकीय पदाचा दुरुपयोग करून कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या पीव्हीसी पाईप पुरवठा योजनेत एकूण ९९ लाख १४ हजार ४९० रुपयांची बेकायदेशीर रीत्या विल्हेवाट लावून शासनाची फसवणूक करूनअपहार केल्याप्रकरणी भारमल व अन्य व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्या गुन्ह्यात आरोपी भारमलसह तत्कालीन प्रकल्प अधिकारी तानाजी पावडे व सम्भंधित कर्मचारी यांच्यावर संगनमत करून शासकीय पदाचा दुरुपयोग करून एचडीइपी पाईप पुरवठा करण्यासाठी कार्यालयाने काढलेल्या बिलाचे एकूण १२ लाख ३६ हजार ४९० रुपयांची बेकायदेशीररीत्या विल्हेवाट लावून शासनाची फसवणूक करीत अपहार केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


जाहिरात: साई इस्टेट कन्सल्टंट अॅण्ड डेव्हलपर्स, संगमनेर

शेतजमीन, प्लॉट, बंगले, गाळा, गुंठेवारी इ. खरेदी विक्रीचे व्यवहार खात्रीशीर केले जातील. तसेच शेतीचे प्लॉट बिगर शेती (N.A.) केले जातील. गुंतवणुकीसाठी प्लॉट उपलब्ध. संपर्क: 9405404536


चौथ्या गुन्ह्यात आरोपी भारमलसह त्यावेळेचे तत्कालीन कर्मचारी व्यवस्थापकीय संचालक  कंपनी व त्यांचे कथित मार्केटिंग संचालक यांनी संगनमत करून आदिवासी लाभार्थ्यांना म्हशीचे युनिट खरेदी व पुरवठा यांचे बनावट कागदपत्रे तयार करून यातील आरोपींनी संगनमत करून १ कोटी २४ लाख रुपयांचा अपहार व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पाचव्या गुन्ह्यात तत्कालीन प्रकल्प अधिकारी व कार्यालयातील साम्भंधित कर्मचार्यांनी संगनमत करून कार्यालय मार्फत राबविण्यात येणाऱ्या कन्यादान योजनेत सोन्याचे मंगळसूत्र व संसार उपयोगी भांडे वाटप योजनेत ५० लाख रुपयांची बेकायदेशीररीत्या सदर रकमेची विल्हेवाट लावून शासनाची फसवणूक करून अपहार केल्याप्रकरणी राजूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजूरचे सहायक निरीक्षक पाटील हे पुढील तपास करीत आहे. 

Website Title: News Rajur prakalp fraud 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here