Home अकोले विद्यार्थ्यांनी विचारात बदल केला पाहिजे: पो.नि. नितीन पाटील  

विद्यार्थ्यांनी विचारात बदल केला पाहिजे: पो.नि. नितीन पाटील  

राजूर(News): आजच्या काळात विद्यार्थ्यांनी विचारात बदल केला पाहिजे. नेहमी सकारात्मक विचारांनी परिस्थितीला सामोरे जात आपले साध्य मिळविले पाहिजे. आपल्याला जरी अपयश आले तरी न खचता आपण सकारात्मक विचारांनी पुढे गेले पाहिजे असे प्रतिपादन राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पो.नि. नितीन पाटील यांनी राजूर येथील गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या मुलांना ‘सेंड ऑफ’  हल्ली त्याला शुभेच्छा समारंभ म्हणतात देण्यात आला यावेळी ते बोलत होते.

आजच्या पिढीची भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असेल, यापू्र्वीच्या विद्यार्थ्यांनी सेंड ऑफच्या दिवशी एकमेकाला रडत-रडत निरोप दिला असेल आणि आता या मुलांच्या या भावना, या सर्वांमागे नक्कीच समान सूत्र आहे. सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. फक्त व्यक्त करण्याच्या पद्धती, साधनं वेगळी! अनेकजण अनेक सुरांनी बोलतात की हल्ली शालेय मुलांना शाळेविषयी काही वाटत नाही, ‘कुणी म्हणतं या नव्या पिढीला शिक्षकांविषयी काही आपुलकी नसते,’ पण नेहमीच हे खरं नसतं अशा भावनिक प्रतिक्रिया सत्यानिकेतन संस्थेचे सह सचिव मिलिंद उमराणी यांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षक यांनी आपले मनोगते व्यक्त केले.

या कार्यक्रमप्रसंगी सत्यानिकेतन संस्थेचे सह सचिव मिलिंद उमराणी, व्यवस्थापक प्रकाश महाले, उपप्राचार्य लहानू पर्बत, जेष्ठ शिक्षक एस.एस. पाबळकर, बी.एन. ताजने, भारत भोसले व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. बिना सावंत यांनी केले तर आभार ए.एफ. धतुरे यांनी मानले.

Website Title: News Rajur positive thinking Nitin Patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here