निळवंडेतून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू
Nilwande Dam: १,३०० क्युसेकने लाभक्षेत्रासाठी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले.
अकोले: निळवंडे धरणातून शनिवारी सायंकाळी पिण्याचे पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदाचे सहायक अभियंता अभिजीत देशमुख यांनी दिली आहे.
निळवंडे धरणातून शनिवार, दि. ३ रोजी सायंकाळी १,३०० क्युसेकने लाभक्षेत्रासाठी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. वक्राकार स्पिल वे गेटमधून ६५० व विद्युतनिर्मिती गृहातून ६५० क्युसेकने पाणी प्रवरा नदीपात्रातून लाभक्षेत्राकडे झेपावले.
Business Idea | कार मधून कसे पैसे कमवतात | Car Business Earn Money
साधारण ५०० दशलक्ष घनफूट पाणी या आवर्तनात खर्ची होणार आहे. तीन-चार दिवस हे आवर्तन चालेल, असे जलसंपदाचे सहायक अभियंता अभिजीत देशमुख यांनी सांगितले.
Web Title: Nilwande Dam Start drinking water circulation
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App