Home अहमदनगर अहमदनगर: कर्ज हप्त्याच्या वादातून गोळीबार

अहमदनगर: कर्ज हप्त्याच्या वादातून गोळीबार

Ahmednagar Firing: कर्जदार व वसुली एजंट यांच्यात बाचाबाची, ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलामधून फायरिंग केली.

Firing over loan repayment dispute

श्रीगोंदा | Shrigonda: एका फायनान्स कंपनीच्या कर्जाचे हप्ते थकल्याच्या कारणावरून कर्जदार व वसुली एजंट यांच्यात बाचाबाची झाली. अक्षय अर्जुन औटी (रा. सरदवाडी, ता. शिरूर) यांच्यावर दोघांनी गोळीबार केला. मात्र सुदैवाने अक्षय औटी बचावले. ही घटना नगर पुणे महामार्गावर गव्हाणेवाडी येथे शुक्रवारी (दि. २) रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली.

अक्षय औटी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संकेत संतोष महामुनी (रा. बाबूरावनगर, ता. शिरूर, जि. पुणे), संकेत सुरवसे (रा. सरदवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) या दोघांविरोधात बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Business Idea | कार मधून कसे पैसे कमवतात | Car Business Earn Money

फिर्यादीने एका फायनान्स कंपनीकड़न वाहन क्रमांक एमएच १२ एसई ७५५७ साठी कर्ज घेतले होते. यातील आरोपी संकेत महामुनी हा फायनान्स कंपनीत कर्जवसुलीचे काम करतो. फिर्यादीच्या वाहनाच्या कर्जाचे हप्ते थकले होते. त्या कारणावरून फिर्यादी व संकेत महामुनी यांच्यात पूर्वी भांडण झाले होते. फिर्यादी हे मित्राच्या वाढदिवसाचा कार्यक्रम संपवून त्यांच्या चारचाकी वाहनातून घरी चालले होते. त्यावेळी यातील आरोपींनी फिर्यादीस ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलामधून फायरिंग केली. मात्र फिर्यादी अक्षय औटी बालंबाल बचावले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मच्छिंद्र खाडे करीत आहेत.

Web Title: Firing over loan repayment dispute

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here