अहमदनगर: पाय घसरून विहिरीत पडल्याने तरुणाचा मृत्यू
Ahmednagar: विहिरीत पडल्याने एका तरुणाचा पाण्यात बुडून (Drowned) मृत्यू झाल्याची घटना.
नेवासा | Nevasa: पाचेगाव विहिरीच्या कडेला झाड तोडत असताना पाय घसरून विहिरीत पडल्याने एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील गोणेगाव शिवारात शनिवारी घडली.
गणेश आण्णासाहेब दिघे (वय ३२, रा. गोणेगाव, ता. नेवासा) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश दिघे हा शनिवारी (दि. ३) सकाळी ११ च्या सुमारास विहिरीच्या कडेला झाड तोडत असताना पाय घसरून तो विहिरीत पडला. गणेशला गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढल्यानंतर नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. याप्रकरणी आण्णासाहेब दिघे यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
Business Idea | कार मधून कसे पैसे कमवतात | Car Business Earn Money
Web Title: A youth drowned after falling into a well
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App