संगमनेर: कोल्हार घोटी राज्य मार्गावर दुचाकीचा अपघात, एक ठार, एक जखमी
Sangamner Accident: लोणीकडून संगमनेरकडे जाणाऱ्या दुचाकीची व वृद्ध इसमाची धडक झाली. त्यामध्ये ८० वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला.
संगमनेर : भरधाव वेगाने जाणार्या मोटर सायकल धडक दिल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तालुक्यातील कोकणगाव परिसरातील निझर्णेश्वर फाट्याजवळ घडली.
या अपघातात मोटरसायकल वरील एक जण जखमी झाला.शिवापुर परिसरात राहणारे 75 वर्षांचे वृद्ध गृहस्थ निझर्णेश्वर फाटा येथे रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला. लोणीहून संगमनेरकडे येणार्य मोटरसायकलने त्यांना धडक दिली. या धडकेत वृद्ध इसमाचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या ताफ्यासह लोणीकडून संगमनेरच्या दिशेने येत होते. त्यांनी हा अपघात पाहिल्यावर आपल्या गाडीतून खाली उतरत अपघातातील जखमीला मदत करण्याच्या सूचना तेथे उपस्थित असणार्या पोलिसांना केल्या.
Business Idea | कार मधून कसे पैसे कमवतात | Car Business Earn Money
कोल्हार – घोटी राज्यमार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून शुक्रवारी दुपारी मांची फाट्यावर ट्रॅक्टर, पिकअप आणि दुचाकीच्या धडकेत तालुक्यातील वडगावपान येथील दोन सख्खे चुलत भाऊ ठार झाल्याची घटना ताजी असतानाच २४ तासात या रस्त्यावर तिसरा बळी गेला आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील ८० वर्षीय तात्याबा गणपत त्रिभवन हे कोकणगाव जवळील शिवापूर येथील आपल्या मुलीकडे राहत होते. ते काल सायंकाळी निझर्णेश्वर फाटा येथे रस्ता ओलांडत होते. यावेळी लोणीकडून संगमनेरकडे जाणाऱ्या दुचाकीची व वृद्ध इसमाची धडक झाली. त्यामध्ये ८० वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला तर दुचाकीस्वार प्रशांत केकणे (वय -२३, रा. निफाड) हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यांवर संगमनेर येथिल खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या स्थानिक नागरिकांनी दिली.
अपघात झाल्याच्यानंतर काही मिनिटात राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या ताफ्यासह लोणीकडून संगमनेरच्या दिशेने येत होते. त्यांनी हा अपघात पाहिल्यावर आपल्या गाडीतून खाली उतरत अपघातातील जखमीची विचारपूस करत योग्य त्या सुचना दिल्या.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पाठवून मदत कार्य करण्यास सुचित केले.
Web Title: One killed, one injured in a two-wheeler accident
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App