Home Accident News संगमनेर:  दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण ठार

संगमनेर:  दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण ठार

Sangamner Accident:  दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना.

One person was killed in a head-on collision between two bikes Accident

संगमनेर: दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील सायखिंडी शिवारात हॉटेल कृष्णा गार्डन जवळ महामार्गावरती घडली.  संगमनेर तालुक्यातील सायखिंडी शिवारातून कनोली येथील रहिवासी असणारे दत्तू तुकाराम वर्षे (वय 50) हे दुचाकीवरून जात असताना महामार्गावरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीनी त्यांना समोरून जोराची धडक दिली. या अपघातात दत्तू वर्षे हे गंभीररीत्या जखमी झाले.

त्यांना तात्काळ घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचाराचासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याबाबत विक्रम वाबळे यांनी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या पर्याय देऊन पोलिसांनी अज्ञात मोटरसायकल स्वराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी  अधिक तपास पो. नि. देविदास ढोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हे करत आहे.

Web Title: One person was killed in a head-on collision between two bikes Accident

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here