Home क्राईम नराधम बापाकडून लैंगिक शोषण, घरातून पळून प्रियकरासोबत लग्न अन….

नराधम बापाकडून लैंगिक शोषण, घरातून पळून प्रियकरासोबत लग्न अन….

Nagpur Crime: पंधरा वर्षांच्या मुलीचे बापाने वारंवार लैंगिक शोषण,  प्रियकराविरुद्ध बलात्कार (Rape) केल्याची तक्रार.

Rape Case Sexually abused by a murderous father, ran away from home and married a lover

नागपूर : पंधरा वर्षांच्या मुलीचे बापाने वारंवार लैंगिक शोषण केले. बापाच्या तावडीतून तिची सुटका व्हावी म्हणून प्रियकराने तिला पळवून नेले. मात्र, दोन महिन्यांची गर्भवती असलेल्या प्रेयसीने आता प्रियकराविरुद्ध बलात्कार केल्याची तक्रार दिली. त्यामुळे वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रियकराला अटक केली. कैलास राजकुमार अडमाचे (२५, आठवा मैल, वाडी) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  पीडित मुलगी टिना (काल्पनिक नाव) ही दहावीत असतानाच तिच्या दारुड्या बापाची वाईट नजर तिच्यावर पडली. घरी कुणी नसताना बापाने तिच्यावर वारंवार लैंगिक शोषण करणे सुरू केले. बापाच्या अत्याचाराला ती कंटाळली होती. यादरम्यान, तिचे गावातील कैलास अडमाचे या तरुणाशी प्रेम संबंध  जुळले. ती कैलाससोबत पळून नागपुरात आली. दरम्यान, ती गर्भवती झाल्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या. गवंडी काम करणाऱ्या कैलासने लग्न न करताच वडील म्हणून बाळाला नाव दिले. सध्या टिना १७ वर्षांची असून ती पुन्हा गर्भवती झाली. तिने गर्भपात करण्याचे ठरवले. मात्र, डॉक्टरांनी तिचे आधारकार्ड तपासले असता ती अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. त्यामुळे डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून कैलासविरुद्ध बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Rape Case Sexually abused by a murderous father, ran away from home and married a lover

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here