Home क्राईम जन्मदात्या बापामुळं लेकीने संपवले आयुष्य, मृत्यूपुर्वी पोलिसांना सांगितले धक्कादायक कृत्य

जन्मदात्या बापामुळं लेकीने संपवले आयुष्य, मृत्यूपुर्वी पोलिसांना सांगितले धक्कादायक कृत्य

दारुड्या बापाच्या शिवराळ भाषेला कंटाळून एका १९ वर्षीय युवतीने विष पिऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना.

girl ended her life because of her birth father, the shocking act was told to the police before her death

रायगडः दारुड्या बापाच्या शिवराळ भाषेला कंटाळून एका १९ वर्षीय युवतीने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना महाड तालुक्यातून समोर आली आहे. दारुड्या बापाने आपल्या मुलीला शिवीगाळ केल्यामुळे एका २२ वर्षीय तरुणीने १९ मार्च रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली.

सिद्धीका संदीप चव्हाण असे मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे. महाड तालुक्यात भावे चौधरी वाडी येथे हा धक्कादायक प्रकार घडला होता. दारूचे व्यसन असलेले वडील मुलीची आई व मुलगी यांना सतत शिवीगाळ करीत असत. १९ मार्च रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास सिद्धीका हिला उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने तिला प्राथमिक उपचाराकरिता महाड ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले. तिची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने तिला तातडीने अधिक उपचाराकरिता मुंबई येथील जे. जे. रुग्णालय येथे पाठविण्यात आले होते. मात्र तिची प्रकृती अधिक खालावली उपचार सुरू असताना सिध्दीका हिने २२ मार्च रोजी जे. जे. रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

वडील दारु पिऊन सतत शिवीगाळ करीत होते त्यामुळे त्यांच्या जाचाला कंटाळून मी उंदराचे (रेक्टोल) औषध प्यायली आहे असा सिद्धीका हिने मृत्यूपूर्वी जबाब दिला आहे. काल गुरुवारी उशिरा महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे या मृत्यूची अकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार आर. के. गोरेगावकर हे करीत आहेत.

Web Title: girl ended her life because of her birth father, the shocking act was told to the police before her death

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here