Home अहमदनगर अल्पवयीन मुलीस आई वडिलांनी अमानुष मारहाण करत काढले घराबाहेर, आई वडिलांवर गुन्हा

अल्पवयीन मुलीस आई वडिलांनी अमानुष मारहाण करत काढले घराबाहेर, आई वडिलांवर गुन्हा

parents of the minor girl were beaten out of the house by their parents crime filed

अहमदनगर | Crime: अल्पवयीन मुलीला मारहाण करत घराच्या काढल्याप्रकरणी सावत्र आई व वडिलांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ललिता तीरथ दिव्यंका व तीरथ दिव्यंका रा. तपोवन रोड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. चाईल्ड लाईन कर्मचार्यांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलगी मधु दिव्यंका हिची आई वडिलांच्या ताब्यातून सुटका करण्यात आली आहे. चाईल्ड लाईन सदस्य प्रवीण कदम यांनी फिर्याद दिली आहे.

५ ते ६ दिवसांपासून एक अल्पवयीन मुलगी तपोवन रोड परिसरात बेवारस अवस्थेत फिरत होती. तिच्या शरीराला जखमा सुद्धा आहे, असा फोन चाईल्ड लाईनला आला. चाईल्ड लाईनचे प्रवीण कदम आणि प्रियंका गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. तिच्याकडे विचारणा केल्यानंतर तिने त्यांना सांगितले की, माझी सावत्र आई दारू पिऊन दररोज मला मारत असते, अंगाला चटके देत असते, जेवण देत नाही, घरा बाहेर काढते. मागील पाच दिवसापूर्वी आईने खूप दारू पिऊन मला लाटण्याने डोक्याला, हाताला, डोळ्याला मारले होते. या कारणाने मी घरातून निघून आले. तेव्हापासून मी असेच फिरत आहे आणि जे काही मिळेल ते मी खात आहे, अशी व्यथा त्या मुलीने चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली.

याबाबत त्यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी उपनिरीक्षक सुरज मेढे, पोलीस कर्मचारी शिरीष तरटे, महिला कर्मचारी गहिले यांना घटनास्थळी पाठविण्यात आले.  चाईल्ड लाईनचे कदम यांच्या फिर्यादीवरून मारहाण  करणार्‍या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: parents of the minor girl were beaten out of the house by their parents crime filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here