Home अहमदनगर आरोपी वाहनातून पडून मृत्यूप्रकरणी पोलीस निरीक्षकासह तिघे निलंबित

आरोपी वाहनातून पडून मृत्यूप्रकरणी पोलीस निरीक्षकासह तिघे निलंबित

Ahmednagar News police inspector, have been suspended in connection with the death of an accused 

अहमदनगर | Ahmednagar news: गुन्ह्यातील आरोपीस ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणत असताना हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत भिंगार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख, सहायक फौजदार नैमुद्दीन शेख व पोलीस कर्मचारी पालवे  यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली

मयत सादिक लाडलेसाहब वय 32 रा. मुकुंदनगर हा वाहनातून पडून जखमी) झाला असल्याचे शवविच्छेदनच्या प्राथमिक अहवालातून समोर आले आहे.

आरोपी सादिक बिराजदार विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने पोलीस कर्मचारी शेख आणि पालवे त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना भिंगार नाला परिसरात सादिकला पाच जणांनी मारहाण केली असल्याची फिर्याद सादिकची पत्नी रुक्सार बिराजदारने दिलेली आहे. त्यानुसार पाच जणांविरोधात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल आहे.

मात्र, आरोपी सादिकला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना त्याने चालू वाहनातून उडी मारली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दोन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झाले होते. त्यानुसार या दोन्ही प्रकरणांची व घटनेची चौकशी करण्याचे आदेश अधीक्षक पाटील यांनी शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडे सोपविला होता. या चौकशीचा अहवाल ढुमे यांनी अधीक्षक मनोज  पाटील यांच्याकडे सादर केला आहे. पोलिसांकडून आरोपी पकडण्याच्या संदर्भात योग्य कार्यवाही झालेली नाही. जेवढी काळजी घ्यायला पाहिजे होती, तेवढी घेतलेली नाही, असे प्राथमिक अहवालावरून दिसून येत असल्याचे अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी तिघे दोषी असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Ahmednagar News police inspector, have been suspended in connection with the death of an accused 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here