Home अहमदनगर जिल्ह्यात आढळले डेल्टा प्लसचे चार रुग्ण, या तालुक्यांत शिरकाव

जिल्ह्यात आढळले डेल्टा प्लसचे चार रुग्ण, या तालुक्यांत शिरकाव

Ahmednagar news delta plus entry

अहमदनगर | Ahmednagar News: जगात डेल्टा प्लस या कोरोनाच्या व्हेरीयंटने धुमाकूळ घातला आहे. अहमदनगर जिल्ह्यात डेल्टा प्लस ने शिरकाव केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात चार रुग्ण आढळून आले आहेत.

डेल्टा प्लस रुग्णांत पारनेर शहर व तालुक्यात एक, श्रीगोंदा शहर व पाथर्डी तालुक्यातील मंगरूळ गावात असे चार रुग्ण आढळून आले आहेत.

काळजी करण्याचे काहीही कारण नाही कारण हे सर्व रुग्ण बरे झालेले आहेत. आरोग्य विभाग या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेत आहे.  दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचे नव्याने ७१२ रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात डेल्टा प्लस ह्या व्हेरीयंटने शिरकाव केला असला तरी हे रुग्ण बरे झालेले आहेत. काळजी घेणे हे अतिशय महत्वाचे आहे अन्यथा तिसरी लाट जोरदार मुसंडी मारू शकते.

Web Title: Ahmednagar news delta plus entry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here