Home अहमदनगर पुलावरून पडून नदीत पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पुलावरून पडून नदीत पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Parner death of a young man who fell from a bridge and drowned

पारनेर | Parner: जुन्नर तालुक्यातील मंगरूळ गावामध्ये मंगळवार दिनांक ८ जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कुकडी नदी पात्रात दोन तरुण बुडाले होते. यामध्ये मनसुक मारुती मोरे वय वर्ष ३९ रा. रांधे ता. पारनेर याचे दुर्दैवी निधन झाले आहे तर त्याचा मोठा भाऊ पोपट मारुती मोरे वय ४२ याला वाचविण्यात स्थानिक नागरिकांना यश आले आहे.

दोघे तरुण साक्खे भाऊ असून पारनेर तालुक्यातील रांधे येथील मूळ राहिबासी आहेत. पोपट मोरे हा पुण्यातील टेल्को कंपनीत नोकरीला आहे. त्याचा छोटा भाऊ मनसुख याची तबियत बरी नव्हती म्हणून उपचारासाठी त्याला घेऊन ते मोटारसायकलवर चालले होते. जुन्नर तालुक्यातील मंगरूळ येथील पुलावर आल्यानंतर मनसुख याचा अचानक तोल जाऊन तो कुकडी नदीवरील पुलावरून नदीमध्ये पडला. मोठा भाऊ पोपट मोरे याने त्याला वाचाविण्यासाठी उडी घेतली मात्र मनसुख तोपर्यंत खोल पाण्यात बुडाला होता. या घटनेची माहिती समजताच आळे फाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title: Parner death of a young man who fell from a bridge and drowned

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here