Home Ahmednagar Live News Fire: धावत्या भरलेल्या बसला आग लागून खाक

Fire: धावत्या भरलेल्या बसला आग लागून खाक

Pathardi burning bus caught fire

Ahmednagar | Pathardi | पाथर्डी: नांदेडहुन पुण्याकडे जाणाऱ्या एका भरलेल्या खाजगी प्रवासी वाहतूक बसला आग (Fire) लागून ही बस पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील शेकटे फाट्या नजीक कल्याण -निर्मल (विशाखापट्टण) राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

बसला पाठीमागून आग लागल्याचे समजताच बसच्या मागे असलेल्या वाहन चालकाला आग लागल्याची कल्पना दिल्यांनतर बस रस्त्याच्या बाजूला घेऊन प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. बसमध्ये ३० ते ३५ प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता मात्र प्रसंगावधान राखत या सर्व प्रवाशांना तात्काळ बसमधून बाहेर काढण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस स्टेशनचे स.पो उपनिरिक्षक कुमार कराड,पो. कॉ.संदीप कळमकर,किशोर पालवे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

पाथर्डी (Pathardi) नगरपालिकेच्या अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते मात्र तोपर्यंत बस पूर्ण आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून भस्मसात झाली होती.

Web Title: Pathardi burning bus caught fire

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here