संगमनेर दुर्दैवी घटना: शेततळ्यात पडून महिलेचा मृत्यू
Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार येथे दुर्दैवी घटना घडली आहे. पाणी आणण्यासाठी गेलेल्या एका ६७ वर्षीय महिलेचा पाय घसरून शेततळ्यात पडल्याने बुडून (drowned) मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.
भीमाबाई केशव डुंबरे असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास भीमाबाई डुंबरे या पाणी घेण्यासाठी शेततळ्याकडे गेल्या होत्या. मात्र शेततळ्यातून पाणी काढत असताना पाय घसरून त्या शेततळ्यात पडल्या. यामुळे पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहीती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने महिलेचा मृतदेह बाहेर काढला. संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्चेदन करण्यात आले. संजय अंकुश डुंबरे यांच्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले हे करीत आहे.
Web Title: Sangamner Woman dies after slipping and drowned in a field