Rape Case: नात्याने पुतण्या असणाऱ्या तरुणाने काकूवर केला बलात्कार
घोटी: घोटी येथील मांजरगावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या पूर्वतयारीसाठी बाहेरगावी गेलेल्या विवाहित महिलेवर गावातीलच नात्याने पुतण्या लागणाऱ्या तरुणाने बलात्कार (Rape) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदर तरुणास अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेणवड बुद्रुक ता. इगतपुरी येथील कुटुंब आपल्या नातेवाईकांच्या लग्नाच्या पूर्व तयारीसाठी गुरुवारी सायंकाळी मांजरगाव येथे गेले असताना अशातच गावातील नात्याने पुतण्या लागणाऱ्या संशयित किरण वसंत दिवटे वय २२ रा.शेणवाड बुद्रुक याने नात्याने लागणाऱ्या काकुस नाना दारू पियुन अंधारात पडले असल्याचे सांगून तिला नाल्याकडे घेऊन गेला. यावेळी अंधाराचा फायदा घेत त्याने विवाहितेला ओढाताण करत नेले व जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexually abusing) केला. यावेळी महिलेने कशी बशी सुटका करू घेत नातेवाईक यांच्या घरी पोहोचली आणि सर्व प्रकार कथन केला. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तरुणावर गुन्हा दाखल केला असून घोटी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशियीत आरोपीस अटक करण्यात आली आहे.
Web Title: Ghoti young man rape his aunt