Home Accident News संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू, अकोलेतील रहिवासी पोलिसाचा मृत्यू

संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू, अकोलेतील रहिवासी पोलिसाचा मृत्यू

Sangamner News:   आंबी खालसा शिवारात हा अपघात (Accident), अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू.

Police killed in collision with an unknown vehicle Accident

संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे. नाशिक-पुणे महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणार्‍या लेनवर संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा  शिवारात हा अपघात गुरुवारी (दि.13) रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास झाला. ते घारगाव पोलीस ठाण्यात शिपाई पदावर कार्यरत होते.

पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम देवराम रोंगटे (वय 32, रा. सावरकुटे, ता. अकोले, जि. अहमदनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम रोंगटे यांना गुरुवारी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणार्‍या लेनवर आंबी खालसा गावचे शिवारात अज्ञात वाहनाने जोरदार धडक  दिली. या अपघातात रोंगटे हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

या  घटनेची नोंद घारगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस कॉन्स्टेबल महादेव रामचंद्र हांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनावरील चालकाविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे करत आहे.

Web Title: Police killed in collision with an unknown vehicle Accident

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here