Home क्राईम संगमनेरच्या तालुका वैद्यकीय अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेरच्या तालुका वैद्यकीय अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

Sangamner News:  कारमधून भरधाव वेगाने संगमनेरकडे येत असताना त्यांनी मोटारसायकलला धडक दिली होती. या अपघातात (Accident)  एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला होता. व नंतर फरार झालेल्या संगमनेर तालुका पंचायत समिती कार्यालयातील तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यावर अखेर गुन्हा दाखल.

An accident case has been filed against Taluka Medical Officer of Sangamner

संगमनेर: भरधाव वेगाने कार चालवून एकाच्या मृत्यूस व एकाच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत  ठरलेल्या व नंतर फरार झालेल्या संगमनेर तालुका पंचायत समिती कार्यालयातील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांच्या विरुद्ध अखेर काल मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील वडगावपान परिसरात दिनांक 2 जुलै रोजी कार व मोटरसायकलचा अपघात झाला होता. डॉ. सुरेश घोलप हे आपल्या कारमधून भरधाव वेगाने संगमनेरकडे येत असताना त्यांनी मोटारसायकलला धडक दिली होती. या अपघातात  एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला होता.

या अपघातानंतर पोलिसांना कुठली माहिती न देता डॉ. घोलप हे फरार झाले होते. अपघातात जखमी झालेला शुभम विलास ठाणेकर यास पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन त्यांचा जबाब घेतला. याबाबत शुभम विलास ठाणेकर (रा. लोणी) याने दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात  पोलिसांनी डॉ. सुरेश विश्वनाथ घोलप (रा. संगमनेर) याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 451/2023 भारती दंड संहिता कलम 304 (अ), 279, 337, 338, 427, सह मोटार वाहन कायदा कलम 184, 134 (अ) (ब)/177 प्रमाणे दाखल केला आहे.

Web Title: An accident case has been filed against Taluka Medical Officer of Sangamner

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here